
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरी तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या रत्नागिरी तालुका दौऱ्याला सुरुवात झाली. तालुक्यातील चिंचखरीतील भात शेतीच्या नुकसानीची पहाणी त्यांनी केली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी येथील सामूहिक शेतीचे कौतुक केले. चिंचखरीतील ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहून कृषीसाठी विशेष योजना भाजपच्या माध्यमातून आखण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न आणि बँक अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तत्काळ अडचणी सोडवू या असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन,आ. प्रसाद लाड हेही उपस्थित होते.
www.konkantoday.com