वाटुळ येथे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने कंटेनर पलटी
कंटेनर ट्रेलरचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने कंटेनर पलटी होवून अपघात झाल्याची घटना मुंबई गोवा महामार्गावर वाटूळ येथे घडली. यात.कंटेनर चालक अनिल पाल किरकोळ दुखापत झाली. तर कंटेनरचे किरकोळ नुकसान झाले.
कंटेनर चालक अनिल पाल हा आपल्या ताब्यातील एम एच ४३ वाय ४०२८ हा कंटेनर घेवून मुंबईच्या दिशेने चालला होतो. ओल्ड गोवा येथून उरण जेटी येथे जात होता तो वाटूळ येथील महापुरुष देवळाजवळील उतारावर धनगरवाडीच्या एका अवघड वळणावर आला असता कंटेनरच्या ट्रेलरचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्यामुळे अपघात होऊन पलटी झाला.
www.konkantoday.com