
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान
निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून रत्नागिरीतील १३ स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. निसर्गाच्या या पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय निसर्गासोबत जगू देणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे.
www.konkantoday.com