रत्नागिरी जि.प.ला मागणीनुसार निधी, देण्याचे नामदार हसन मुश्रीफ यांचे आश्वासन
रत्नागिरी जिल्हा परिषदेसह नऊ पंचायत समित्यांमधील अधिकारी खातेप्रमुखांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार ग्रामीण विकासाकरिता विशेष निधी देण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प. पदाधिकारी, आमदार यांनी ना. मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेवून प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. आमदार डॉ. राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य, बांधकाम सभापती महेश उर्फ बाबू म्हाप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com