रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे.-उद्योग मंत्री सुभाष देसाई
रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे. तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात कधीही होणार नव्हता त्यामुळे आता तो रायगडमध्ये रद्द केल्याची आवई उठविणे चुकीचे असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
त्या भागातील लोकांच्या हिताचा विचार करुन नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती.आमच्या दबावामुळेच आधीच्या सरकारला तो प्रकल्प रद्द करावा लागला. आता तर आमचेच सरकार आहे. असे असताना तेल शुद्धिकरण प्रकल्प अन्यत्र उभारण्याची भूमिका घेणे शक्य नाही. आधीही आम्ही ही भूमिका कधीच घेतलेली नव्हती. आधीच्या सरकारने वा आताच्याही सरकारने सदर प्रकल्प नाणारमधून रायगड जिल्ह्यात स्थानांतरित करण्याची साधे सुतोवाचदेखील कधी केले नव्हते,
देशात तीन मोठे फार्मास्युटिकल हब उभारण्याची केंद्राची योजना आहे. त्यातील एक हब हा रायगडनजीक उभारला जाणार आहे. या हबसाठी सिडकोने संपादित केलेल्या जमीन देण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाने दिलेला आहे. रोहा आणि मुरुड तालुक्यातील नवनगरासाठीचे अधिसूचित क्षेत्र वगळण्यात आले आहे. सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूकही रद्द केल्याचे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com