
*हापूस आंब्याला ‘थ्रीप्स’चा विळखा*
____हापूस आंब्याला ‘थ्रीप्स’चा विळखा पडला असून मोहोर करपत चालला आहे.त्यामुळे फळे डागाळून जमिनीवर कोसळू लागली आहेत. कोणत्याही किटकनाशकांचा थ्रीप्स नियंत्रण आणण्यासाठी उपयोग होत नसल्याने आंबा बागायतदारांसमोर कधी नव्हे एवढे मोठे संकट उभे राहिले आहे. विद्यापीठ, कृषी विभागाचे अधिकारी देखील थ्रीप्सपुढे हतबल झाले आहेत.www.konkantoday.com