
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या ११ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पहाटे दोनच्या सुमारास अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल स्तराची घोषणा करण्यात आलीदरम्यान सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव्ह या ५५ मजली इमारतीमधील जवळपास ३५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.
www.konkantoday.com