
सीआरझेडच्या 2019 च्या सुधारित आराखडा ई-सुनावणीचा नेटवर्कअभावी पूर्ण फज्जा उडाला
सिंधुदुर्ग जिल्ह्यावासीयांचा तीव्र विरोध डावलून प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या सीआरझेडच्या 2019 च्या सुधारित आराखडा ई-सुनावणीचा नेटवर्कअभावी पूर्ण फज्जा उडाला. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी व्यक्त केलेल्या सूचना पुरेशा नेटवर्कअभावी जनतेपर्यंत पोहोचू शकल्या नाही. सहभागी नागरिकांना आपले म्हणणे मांडताही येत नव्हते. यामुळे उपस्थितांनी याला आक्षेप घेत सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. याची दखल घेतली न गेल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी बहिष्कार घालत सभात्याग केला. त्यामुळे आजची ई-सुनावणी रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. आता ही सुनावणी मंगळवारी (ता.29) ऑफलाईन पद्धतीने तालुकावार घेतली जाणार आहे.
www.konkantoday.com