आमदार, खासदार अजूनही शेतकर्यांच्या बांधावर पोचले नाहीत-माजी खासदार नीलेश राणे
मुसळधार पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीसाठी आस लावून बसले आहेत. त्यांचे अश्रू पुसायला कोणीच आलेले नाही. काही गावात अधिकारीच पोचलेले नाहीत. यावरुन स्थानिक राज्यकर्ते शेतकर्यांबाबत किती गंभीर आहे, ते दिसून येते. मंत्री, आमदार, खासदार अजूनही शेतकर्यांच्या बांधावर पोचले नाहीत, असा आरोप भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केला
पुढे बोलताना राणे म्हणाले, पावसामुळे नुकसान झालेल्या हरचिरी, निवळीसह काही गावांची भाजप पदाधिकार्यांसह पाहणी केली. तालुक्यातील ३० ते ४० टक्के पंचनामे अजून शिल्लक आहेत.
www.konkantoday.com