
मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.
आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजवाडी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आरवली राजवाडी मारुती मंदिरासमोर शनिवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली.मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची पाहणी केल्यावर असे दिसून येते की, बिबट्या रात्रीच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी काही ग्रामस्थांना महामार्गावर बिबट्याचा मृतदेह दिसला.