कोरोनाचे रूग्ण घटल्याने घरडा कोविड सेंटर बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तालुक्यातील लवेलमधील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटली असल्याने प्रशासनाकडून ते सेंटर बंद करण्यात आले आहे.
घरडा महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहात शासकीय कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ७०० हून अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com