
सिंधुदुर्गात ना.उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी झापलं
भाजप आमदार नितेश राणे कृषी अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरताना हा व्हिडीओ सध्या सिंधुदुर्गात प्रचंड व्हायरल झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहे का, त्याला बघायला जाताय? असं म्हणत उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी झापलं. तसेच तासाभरात देवगड लिंगडाळ गावात न आल्यास मिरवणूक काढण्याची धमकीही त्यांनी फोनवरुन कृषी अधिकाऱ्याला दिली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भातशेती नुकसानीच्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी पालकमंत्र्याच्या दौऱ्यावर तसेच आढावा बैठकीच्या कामात व्यस्त होते.दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करण्यासाठी गेले होते. परंतु या दौऱ्यात तलाठी, कृषी अधिकारी न आल्याने नितेश राणे यांनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापलं.
www.konkantoday.com