जिल्ह्यातील सात पोलिस हवालदारांना पोलिस उप निरीक्षक म्हणून बढती
राज्यातील १ हजार ६१पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सात पोलिस हवालदारांचा समावेश आहे. ते आता पीएसआय (पोलिस उप निरीक्षक) म्हणून सेवा बजावणार आहेत.यामध्ये उदय लक्ष्मण धुमास्कर, कोकण परिक्षेत्र (ठाणे ग्रामीण वगळून ), प्रकाश बाळकृष्ण बाईंग शहाजी भिमराव पवार, अनिल पांडुरंग चांदणे, प्रकाश पांडुरंग जाधव (कोकण परिक्षेत्र ), आनंद शंकर पवार कोकण परिक्षेत्र (ठाणे ग्रामीण वगळून ), विनायक काशिनाथ नरवणे यांची बदली रत्नागिरी तून अमरावती विभागात झाली आहे.
www.konkantoday.com