
चिपळुणात भात पिकाचा विमा उतरवणारे अवघे १२४ शेतकरी
अवकाळी व वादळीवार्यासह कोसळणारा परतीचा पाऊस, अतिवृष्टी, नद्यांना येणारा पूर, लांबलेला पावसाचा हंगाम, विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि जंगली प्राण्यांचा उच्छाद यामुळे कोकणासह चिपळूण तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान होवू लागले आहे. अलिकडच्या काही वर्षात सातत्याने या संकटाला सामोरे जावे लागत असले तरीही भातपिकाचा विमा उतरवण्यात मात्र येथील शेतकर्यांची उदासिनताच दिसून येत आहे. तालुक्यात सुमारे ८० हजार शेतकरी आहेत. मात्र यावर्षी अवघ्या १२४ शेतकर्यांनीच आपल्या पिकाचा विमा उतरविल्याची विदारक बाब समोर आली आहे.
www.konkantoday.com