आमदार राजन साळवी यांच्याद्वारे आयसीयु रूग्णवाहिका राजापुरसाठी सुपूर्द

आमदार राजन साळवी स्थानिक विकास निधीतून मंजुर झालेली आयसीयु रूग्णवाहिका नुकतीच रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल झाली. यावेळी ही रूग्णवाहिका राजापूर तालुक्यासाठी लोकार्पण करण्यासाठी आ. राजन साळवी यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सई धुरी यांच्याकडे चावी देवून सुपूर्द केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उपशहरप्रमुख श्रीकृष्ण चव्हाण, शरद राणे, विभागप्रमुख प्रकाश गुरव, शाखाप्रमुख महेश पाध्ये, शुभम साळवी, सुभाषराव मालप, प्रमोद शितप आदी उपस्थित होते. राजापूर तालुक्यातील बहुतांशी शासकीय आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण भागात रूग्णवाहिका नसल्याने या नव्या आयसीयु रूग्णवाहिकेचा लाभ गंभीर रूग्णांना होऊ शकणार आहे. अशा अद्ययावत रूग्णवाहिकेसाठी आ. साळवी यांनी विशेष प्रयत्न केले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button