सुरक्षारक्षकांनी देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बीगेन अंतर्गत आता विविध विभागांना लोकलने मुंबईत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हीच बाब समोर ठेवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी देखील आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
www.konkantoday.com