
व्याजाचे पैसे दिले नाहीत म्हणून दुकानात घुसून मारहाण, गुन्हा दाखल, एकमेकांविरूद्ध तक्रार दाखल
व्याजाने घेतलेल्या पैशाचे व्याज दिले नाही म्हणून दुकानात घुसून मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी चिपळूण बाजारपेठेत ही घटना घडली.
चिपळूण बाजारपेठेतील सना कलेक्शन या दुकानाचे मालक लियाकत सलीम मेमन यांनी चिपळूण येथील अमित चिपळूणकर यांच्याकडून एप्रिल २०१६ मध्ये २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचे दर महिना २० हजार रुपये व्याज ते त्यांना देत होते. परंतु २०१७ मध्ये त्याना अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी व्याजाचे पैसे देणे बंद केले. जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या काळात त्यांनी व्याजाचे पैसे दिले नाहीत. मात्र ऑक्टोबर २०१८ मध्ये मुद्दल असलेले २ लाख रुपये चिपळूणकर यांना परत केले असे मेमन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. परंतु १५ महिन्याच्या व्याजाचे पैसे देण्यासाठी चिपळूणकर दांपत्याने सतत तगादा लावला होता. दरम्याने चिपळूणकर दांपत्याने देखील मेमन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे
भिशीचे सुमारे चार लाख रुपये मागण्यास गेलो असता जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी लियाकत सलीम मेमन (रा. अब्बास पार्क, गोवळकोट रोड, चिपळूण) यांच्याविरुद्ध अमित चिपळूणकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.komkantoday.com