
लुटमारीविरूद्ध रूग्णहक्क जाहीरनामा व दरपत्रक सक्तीचे व्हावे, भरतशेठ लब्धे यांची मागणी.
रूग्णाला दाखल करून घेतात, औषधांची भली मोठी यादी नातेवाईकांकडे दिली जाते. उपचारांचा आवाजवी खर्च त्यांच्या माथी मारला जातो. योजनेत बसत असतानाही काही रक्कम लाटली जाते, असा सध्याच्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर आपण लुटले जात असल्याची मनोभूमिका जनमानसात दृढ होत चालली आहे. त्यामुळे पारदर्शकतेची गरज असून रूग्णहक्क जाहीरनामा लावण्याची आणि दर पत्रकाची मागणी करूनही शासकीय यंत्रणेने गेल्या दीड वर्षात त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व इंदिरा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भरतशेठ लब्धे यांनी केला आहे.www.konkantoday.com