रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सरकार सकारात्मक
रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सरकार सकारात्मक आहे. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले, तसे ते रत्नागिरीतही देऊ. त्यासाठी आवश्यक सर्व अटींची पूर्तता करा. 20 दिवसांत परवानगी देतो, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यावर ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे आश्वासन दिले.
www.konkantoday.com