
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे नुकसानीचा आकडा १०ते १२ हजार हेक्टरपर्यंत जाईल- नामदार उदय सामंत
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेतला असून नुकसानीचा आकडा १०ते १२ हजार हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली त्यांनी हरचिरी, चांदेराई येथे नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.त्यानंतर राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील आढावा घेतला. त्यामध्ये चारही तालुक्यात प्रत्येकी १५०० ते २००० हेक्टरपर्यंत भातशेती बाधित झाली आहे. नुकसानाचे पंचनामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. कोकणातील माहिती घेण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत.
बाधित शेतकर्यांना तत्काळ मदत देण्यासाठी मागणी करण्यात येईल. हेक्टरी ६,८०० रुपयात वाढ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील
www.konkantoday.com