
जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक, लवकरच जिल्हा रूग्णालय नॉन कोविड करण्यात येणार -ना. उदय सामंत
जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक आहे. जिल्हा कोविड रूग्णालयात सध्या ६६ .रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला रूग्णालय =कोविड रूग्णांसाठी केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी आठ दिवसात कार्यवाही करतील. जिल्हा रूग्णालय नॉन कोविड करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ते सॅनिटाईझ केले जाईल. रत्नागिरी नगरपालिकेने सुरू केलेल्या आरोग्य मंदिर येथील रूग्णालयात पोस्ट कोविड झाल्यानंतर रूग्णांना दिसणार्या लक्षणांवरील मार्गदर्शनासाठी हे केंद्र राहील. सर्वसामान्यांना या मार्गदर्शनाची गरज आहे.
www.konkantoday.com