
कोकणासह राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहे. पावसाचा जोर ओसरत नाही, तोच पुढील ४ दिवसात कोकणासह राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे १९, २०, २१ आणि २२ तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
www.konkantoday.com