पैशाच्या व्यवहारातून संगमेश्‍वरात आलेल्या व्यावसायिकाचा खून, रत्नागिरी पोलिसांनी केली तीन जणांना अटक


पैशाच्या व्यवहारातून संगमेश्‍वरमध्ये आलेल्या व्यावसायिकाचा खून होण्याचा प्रकार घडला आहे
संगमेश्‍वर पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास करत खुनातील तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. महंमद साजिद इब्राहीम अन्सारी (५६) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या व्यावसायिकाचा मृतदेह संगमेश्‍वर तालुक्यातील आंबेडखुर्द तांबेवाडी पायवाटेवर आढळून आला होता.
महंमद साजिद इब्राहीम अन्सारी यांचा मृतदेह बुधवारी सकाळच्या दरम्याने आंबेडखुर्द तांबेवाडी येथील पायवाटेवर आढळून आला होता. याबाबत पोलिसांना संशयास्पद वाटल्याने संगमेश्‍वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, चौधरी, जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. व्यावसायिक महंमद साजिद इब्राहीम अन्सारी रविवारी संगमेश्‍वर येथे आले होते.मुंबईमध्ये जात असताना संगमेश्‍वर-संभाजीनगर येथील सागर मोहिते, सनी मोहिते आणि ठाणे वर्तकनगर येथील अक्षय साळवे यांच्यामध्ये झालेल्या पैशाच्या व्यवहारातून त्यांनी महंमद साजिद इब्राहीम अन्सारी यांचा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. संगमेश्‍वर पोलिसांनी खूनप्रकरणी सागर मोहिते, सनी मोहिते आणि अक्षय साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button