निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार नसल्याचे आढावा सभेत उघड
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक अद्याप जिल्हा परिषदेकडे पाठवलेच नाहीत. ही बाब खा. सुनिल तटकरे यांनी घेतलेल्या आढावा सभेत उघड झाली. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी त्या दुरूस्त न झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत बसायचे तरी कसे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळात दापोली व मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. यात १९० शाळा, १४७ शौचालये, १४ किचन शेडचे नुकसान झाले आहे. या सर्व दुरूस्तीसाठी आठ कोटींचे अंदाजपत्रक शासनाला पाठविले होते.
www.konkantoday.com