
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड टाइम्स ऑफ पुणे आणि हर घर रोजगार यांच्या वतीने उत्कृष्ट काम करण्याऱ्या महिलांना सन्मान – नारी शक्तीचा सन्मान हाच देशाचा सन्मान:- किरण सामंत
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड टाइम्स ऑफ पुणे आणि हर घर रोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान रत्नागिरी येथे करण्यात आला. यावेळी भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते काही महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला किरण सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. महिलांचा सन्मान हाच देशाचा सन्मान असल्याचे सांगत ज्या ज्या महिलांनी चांगली कामगिरी केली त्याचे कौतूक या कार्यक्रमा दरम्यान किरण सामंत यांनी केले. महाराष्ट्र सरकार महिलांसाठी चांगले काम करत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहे.मी तुमचा छोटा भाऊ म्हणून कायम तुमच्या सोबत असल्याचा शब्द यावेळी किरण सामंत यांनी दिला आहे. यावेळी कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद, कार्यध्यक्ष डॉ. मेहबूब सय्यद, संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येत महिला भगिनी उपस्थित होते.www.konkantoday.com