घरगुती गॅसच्या होम डिलिव्हरीत बदल डिलिव्हरीच्या संपूर्ण प्रणालीमध्ये होणार बदल

आता एलपीजी घरगुती गॅसची होम डिलिव्हरीच्या संपूर्ण प्रणालीमध्ये बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडर्सची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्यांकडून नवीन एलपीजी सिलेंडरची सिस्टम लागू केली जाणार आहे. या प्रणालीमुळे सिलेंडर्सची चोरी रोखण्यासाठी मदत होणार आहे.
नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड. आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल.
डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तु्म्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल. ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.
सुरुवातीला काही शहरात प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली लागू केली जाणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button