रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदेराई गावात पुरसदृश्य परिस्थिती…. जनजीवन विस्कळीत ..भात पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने काजळी नदीने रौद्र रूप धारण केले असून चांदेराई बाजारपेठेत पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दुकानदारांची अचानक तारांबळ उडाली आहे. सगळेच दुकानदार आपल्या दुकानाची आवराआवर करू लागलेत पण पाण्याचा प्रचंड वेग आहे
या मुसळधार पावसाने भात पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .
या वर्षी आलेल्या पुराचे प्रशासनाने पंचनामे करून पुढे काहीही नाही अशी ओरड ग्रामस्थ करीत आहेत तर माजी सरपंच दादा दळी यांनीआधीच कोरोनाच्या परिस्थितीत होरपळ लेल्या जनतेला नैसर्गिक आपत्ती चे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे
www.konkantoday.com