
आमचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन होणार नाही, शरद पवार यांचे तातडीने घुमजाव
लोकसभेच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन होतील. आमची विचारधारा कॉंग्रेसशी मिळतीजुळती असल्याने सहकार्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ, असे वक्तव्य बुधवारी शरद पवार यांनी केले होते. उद्धवसेनेचा विचारही आमच्यासारखा असल्याने तेही कॉंग्रेससोबत काम करण्यास सहमत आहेत, असेही पवारांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मात्र गुरूवारी ते म्हणाले, की आमचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन होणार नाही, महाराष्ट्रामध्ये आम्हाला म्हणजे कॉंग्रेस, आमचा पक्ष, उद्धव सेनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आमच्या किमान ३० ते ३५ जागा निवडून येतील. लोकांना बदल हवा आहे. www.konkantoday.com