
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीपाय (फायलेरिया) चे संशयित रूग्ण सापडले, सिंधुदुर्गात ५५ तर रत्नागिरीत ३ संशयित, आरोग्य यंत्रण ऍलर्ट
रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातून आलेल्या मजूर व कामगारांमध्ये हत्तीपाय (फायलेरिया) आजाराचे तब्बल ५५ ते ५६ संशयित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण कोकणातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातही परराज्यातून आलेल्या सर्व मजूर, कामगार व नेपाळी गुरखा वर्गाचे तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात – आले आहे. या शोध मोहिमेत – लोटे एमआयडीसी परिसरात परराज्यातील तीन संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार तसेच नेपाळ येथून आलेले काम कामगार विविध औद्योगिक, बांधकाम आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहेत. या कामगारांमध्ये हत्तीपाय आजाराची लक्षणे आढळू लागल्याने आरोग्य विभागाने जोरदार तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत सुमारे ५६ जण हत्तीपाय संशयित म्हणून आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य आरोग्य संचालनालयाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील सर्व मजूर व कामगारांचे सर्वेक्षण, रक्त नमुने तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
www.konkantoday.com




