
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांना संधी दिली जाणार?
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून अखेर नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूण 12 जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे या जागांवर राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
यापैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते.
www.konkantoday.com