बुधवार, गुरुवार दोन दिवस मुंबई, ठाणेसह दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस
बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अतिकमी दाबाचा पट्टा ताशी १७ किलोमीटर वेगाने पुढे सरकत असून, त्याचा परिणाम म्हणून बुधवार, गुरुवार असे दोन दिवस मुंबई, ठाणेसह दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
www.konkantoday.com