गणपतीपुळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे भगवतीनगर येथे राम रोड येथील एका विहिरीत बिबट्या पडला होता त्याला वनविभागाने सुरक्षितरित्या बाहेर काढून पिंजऱ्यात बंदिस्त केले
राम रोड रोड येथे बापट यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आल्यावर वन विभागाला यासंबंधीची माहिती देण्यात आली वनविभागाचे पथक घटनास्थळी आले त्याने दोऱ्या व अन्य साधनांच्या साह्याने बिबट्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले व पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले
www.konkantoday.com