
कोविड विषाणूवर प्रभावी ठरणारी लस २०२१ च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता
कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून आपण हळूहळू बाहेर येत आहोत. पण, कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील प्रभावी लस केव्हा येईल, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावर भाष्य केले आहे. कोविड विषाणूवर प्रभावी ठरणारी लस २०२१ च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच, लस एकापेक्षा अधिक स्त्रोतांपासून मिळू शकते, असंही हर्षवर्धन म्हणाले आहेत
पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला लस मिळण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com