रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल

रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल असून या कामासाठी ४ हजार ५००कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम केले जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली
तटकरे म्हणाले, या महामार्गासंदर्भात एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांचेसोबत आपली बैठकही झाली आहे. या सागरी महामार्गावर असलेल्या खाड्‌यांवर पूल बांधण्याचे काम या सागरी महामार्गाच्या कामात अंतर्भूत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button