राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाचे रत्नागिरी जिल्ह्यात दारुबंदी सप्ताहात १६ ठिकाणी छापे, ८० हजारांची दारू जप्त केली
राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने रत्नागिरी
जिल्ह्यात २ ते ८ऑक्टोबर दरम्यानच्या दारुबंदी सप्ताहात दारुधंद्यांवर छापे टाकत ८०,७८० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आणि ११ आरोपींना दारुबंदी गुन्ह्यांतर्गत अटक केली आहे़. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आली आहे़. उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीने गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथे छापे घालून कारवाई केली़. एकूण १६ गुन्हे नोंदवण्यात आले असून ही कारवाई भरारी पथकाचे निरिक्षक शरद जाधव, दुय्यम निरिक्षक किरण पाटील, सुनिल सावंत, जवान सागर पवार, निनाद सुर्वे, विशाल विचारे, अनिता नागरगोजे यांनी केली़.
www.konkantoday.com