सरकारने कोरोनाशी लढावे, दारूबंदीशी लढू नये,. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांचे आवाहन

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाशी लढावे, दारूबंदीशी लढू नये, असे आवाहन महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल कोश्‍यारी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात यांना केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button