रत्नागिरी शहरातील महिलेस सांगलीतील सराईत गुन्हेगाराने १२ लाखांचा गंडा घातला.

तहसीलदार असल्याचे सांगून रत्नागिरी शहरातील विधवा महिलेस सांगलीतील सराईत गुन्हेगाराने १२ लाखांचा गंडा घातला. विविध आमिषे दाखवून महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने संशयिताचा शोध घेऊन अटक केली. प्रकाश कल्लेशा पाटील (रा. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर सांगली, सातारा, कोल्हापूर पोलिस ठाण्यात १० ते १२ गुन्हे दाखल आहेत.
त्यानंतर संशयित आणि त्या महिलेची ओळख वाढत गेली. आपण तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत आहे, अशी बतावणी करून ३ फेब्रुवारी २०२० ते ३१ जुलै २०२० या कालावधीत अनेक आमिषे दाखवून वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून १२ लाख पाच हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू असताना संशयिताचा फोटो निष्पन्न झाला. त्यावरून गुप्त खबऱ्याकडून शोध सुरू झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले. पथकाने सांगली येथे जाऊन माहिती काढली. त्यानुसार संशयित आरोपी प्रकाश कल्लेशा पाटील ऊर्फ मधुकर दोरकर याच्या घरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या वेळी संशयित दोरकर मिळून आला. चौकशीत त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्‍या दाखविल्यावर मात्र त्याने कबुली दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button