माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक परिणाम
राज्य शासनाने आयोजित केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. दररोज येणाऱ्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट आता झाली आहे. आरटीपीसीआर आणि ॲन्टीजेन अशा ४९ हजार ३२३ जणांची चाचणी आतापर्यंत झाली आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटले असून आता मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे.
www.konkantoday.com