दसर्यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयांना टाळे ठोकणार- राजू शेट्टी यांचा इशारा
दरमहा ३०० युनिटस्च्या आत वीज वापर असणार्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करावीत व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी दसर्यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयांना टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com