ईन्फिगो ” या डोळ्यांच्या हाॅस्पिटलच्या वतीने नाचणे गावातील बचतगटातील महिलांचे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन
” ईन्फिगो ” या साळवी स्टाॅप येथे नव्याने झालेल्या डोळ्यांच्या हाॅस्पिटलच्या वतीने आज शिवसागर ग्रामसंघ आणि श्री साईं सेवा मित्र मंडळ नाचणेच्या सहकार्यांने नाचणे गावातील बचतगटातील महिलांचे मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते कोरोनाच्या या काळात लोक दवाखान्यात जायला टाळत असतात त्यातच ईन्फिगो हे डोळ्यांचे हाॅस्पिटल साळवी स्टाॅप येथे नव्याने सुरू झाले त्यांनी आपल्या जाहिरातीसाठी आणि लोकांची अडचण समजून घेऊन अशी मोफत शिबीर घेण्याचा मनसुबा या हाॅस्पिटल चे संपर्क अधिकारी श्री पावसकर आणि आंब्रे यांनी बोलून दाखवल्यावर लगेचच श्री साईं सेवा मित्र मंडळ नाचणेच्या सहकार्यांने शिवसागर ग्रामसंघातील बचतगटातील महिलांसाठी शिबीर आयोजित करण्याचे ठरले या शिबीरात ९६ महिलांनी लाभ घेतला ज्यांना पुढे जाऊन तपासणी करायची असेल त्यांना हाॅस्पिटल मधे मोफत उपचार करणेत येणार आहे आणि त्यासाठी त्यांना हाॅस्पिटलच्या वतीने एक कार्ड देण्यात आले आहे ते कार्ड धारकाला आपल्या कुटुंबातील अथवा मित्र मैत्रिणींना मोफत डोळे तपासणी करणेत येणार आहे हे शिबीर यशस्वी करण्यासाठी म्हणजे सोशल डिसस्टन्स, सॅनिटायजरचा वापर,मास्क, गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक बचतगटाला अर्धातास वेळ देण्यात आला होता आणि हे नियोजन शिवसागर ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ सायली केतकर, विद्या सावंत, मैथिली पाटील ,अस्मिता वाडेकर,मानसी तेरवणकर,पूर्वा सावंत ,मनिषा पाटील, संपदा कामत,वर्षा पाटकर नयना देवरूखकर,व ईतर महिला तर साईं मंडळाच्या वतीने संतोष सावंत, विवेक चाळके संतोष लाखण, श्रीकांत बने विजय कुमार ढेपसे यांनी सहकार्य केले तसेच हाॅस्पिटलच्या वतीने मंगेश पावसकर,हर्षदा राजापकर, राकेश आंब्रे,साहिल पिरखान,अमित यादव यांनी तपासणी शिबीर पार पाडले.
www.konkantoday.com