इसिस’ ही दहशतवादी संघटना रत्नागिरीत हातपाय पसरण्याच्या तयारीत?तपासात माहिती उघड
इसिस’ या जागतिक दहशतवादी संघटनेने रत्नागिरीतही आपले हात पाय पसरवण्याचा तयारीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कर्नाटक येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इसिसच्या छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे. या संघटनेच्या हालचालीवर बारीक नजर आहे.केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसात आदी ठिकाणी दहशतवाद्यांनी बस्तान बसविण्याची जय्यत तयारी केली आहे. काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती उघड झाली
www.konkantoday.com