शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तुरंबव येथे शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, आमदार भास्कर जाधव यांचा इन्कार, सावर्डे मधून क्लिप व्हायरल केल्याचा आरोप
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तुरंबव येथे शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ आज सोशल मीडिया वर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाल तुरंबव येथील शारदा देवीचा नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे. येथे ९ दिवस यात्रा भरवली जाते. नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात ६ऑक्टोबरला बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंदिर समितीच्या पदाधिकार्यांमध्ये रुपे लावण्यावरून वाद झाला. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी काही सदस्यांनी भास्कर जाधव यांना बोलविले होते. भास्कर जाधव दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत काढत असताना मंदिराच्या वरच्या मजल्यावरून व्हिडीओ शुटींग केले जात होते.
हा प्रकार भास्कर जाधव यांना समजल्यानंतर त्यांचा पारा चढला. त्यांनी शुटींग करणार्याला शिवीगाळ केली. या दरम्यान पोलिस मंदिरात दाखल झाले त्यामुळे प्रकरण शांत झाले होते मात्र दोन दिवसानंतर हा भास्कर जाधवांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
होता मात्र आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकाराचा इन्कार केला आहे आपण
तुरंबव (ता. चिपळूण) देवी शारदेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत झालेली वादावादी सोडवण्यासाठी मी गेलो होतो. ज्या दोन गटात रूपे लावण्यावरून वाद झाले होते दोन्ही गटांची आपण समजूत घातली दरम्याने त्याठिकाणी पोलिस आले पोलिसांनाही आपण सर्वांना रूपे लावण्यास द्यावी असे सांगितले हा विषय गावच्या देवाचा असल्यामुळे तक्रार करू नये व हा उत्सव शांततेने साजरा करावा असे सांगितले आपण जर तिथे आलो नसतो तर वेगळा घडलं असतं असे आपण पोलिसांना सांगितले त्या ठिकाणी मी कुणालाही मारहाण केलेली नाही, परंतु देवी शारदेच्या मंदिरातील ‘ती’ क्लिप माझ्या राजकीय विरोधक’हितचिंतकांनी’ फिरवल्याचे त्यांनी सांगितले आहे क्लिप मध्ये दोन्ही गटांना शांत करताना एखाद-दुसरी दुसरी शिवी माझ्याकडून गेली असेल हे मी नाकारत नाही परंतु ही क्लिप मोडून तोडून व्हायरल करण्यात आली आहे जशी मागे मी विनायक राऊत यांचा हात झटकले ची क्लिप अशीच मोडून तोडून दाखविण्यात आली होती हे काममाझ्या गावातल्यानी नाही तर गावा बाहेरचे विशेषता सावर्डे भागातील माझे राजकीय विरोधक आहे त्यांनी क्लिप व्हायरल केल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले
wwww.konkantoday.com