
मॅग्मो संघटनेत मतभेद, पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या अध्यक्षावरच व्यक्त केला अविश्वास
महाराष्ट्र राज्य राज्य राज्य पात्री त वैद्यकीय अधिकारी गट व मॅग्मो या संघटनेच्या पदाधिकारी यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भगवान पितळे यांच्यावर अविश्वास दाखविला आहे जिल्हाध्यक्ष यांनी हा निर्णय स्वतःच्या स्वार्थापोटी घेतल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे यामुळे या संघटनेतील फूट उघड झाली आहे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांच्याकडे नियमित कार्यभार सोपवण्यात आला नाही तर संघटनेतील वैद्यकीय अधिकारी राजीनामा देतील असा इशारा डॉक्टर पितळे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता मात्र डॉक्टर पितळे यांनी हा निर्णय जाहीर करताना संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी सदरचा इशारा दिल्याचा खुलासा आता पदाधिकाऱ्यांनी केल्याने संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही तक्रार न करता कोरोना बाधित यांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत व यापुढेही अशीच चांगली सेवा देणार आहे नियमित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले यांच्या कार्यपद्धतीबाबत संघटना पदाधिकारी व सदस्य मध्ये कोणतीही तक्रार नाही याउलट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर अशोक बोल्डे यांच्यावर आरोप केले असून त्यांच्या कार्यकाळात जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ते वर्ग ४ अधिकारी कर्मचारी मानसिक तणावाखाली होते डॉक्टर बोल्डे यांच्या हुकूमशाहीला कंटाळून सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने सिव्हिल मधील कामकाज ठप्प झाले असल्याचे व कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे पत्रात म्हटले आहे जिल्हा प्रशासनाने डॉक्टर बोल्डे यांच्याकडून पदभार काढून घेतलेल्या त्या निर्णयाचे या पदाधिकाऱ्यांनी समर्थन करून त्याला आपला आक्षेप नसल्याचेही संघटनेने म्हटले आहे या पत्रावर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रकाश जांभुळकर सहकोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर ज्ञानेश विटेकर सचिव डॉक्टर मारुती कोरे माध्यम प्रतिनिधी डॉक्टर एमडी गावडे व जिल्हा महिला प्रतिनिधी डॉक्टर राजश्री ढवळे यांच्या सह्या आहेत यामुळे संघटनेतील वाद जाहीर झाला आहे
www.konkantoday.com