गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजी प्रा. लि. या प्रकल्पात गॅसवाहु जहाजाचे आगमन
गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजी प्रा. लि. या प्रकल्पात गॅसवाहु जहाजे येण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यानंतर तिसरे गॅसवाहु जहाज प्रकल्पात दाखल झाले असून त्यातून गॅस काढून घेण्यास सुरवात झाली आहे. मार्शल व्हिसलिव्हस्काय असे या जहाजाचे नांव आहे.
रशियामधील मार्शल व्हिसलिव्हस्काय या जहाजाने नायजेरियातील बोन्नी बंदरात गॅस भरुन १२सप्टेंबरला भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. सुमारे २५ दिवसांनी हे जहाज अंजनवेल येथील कोकण एलएनजी प्रकल्प परिसरातील समुद्रात पोचले. व्हिसलिव्हस्काय जहाज स्थिर झाल्यावर त्यातील सुमारे १.५ लाख क्युबिक मिटर (१५ कोटी लिटर) इतका गॅस पाईपलाईनद्वारे एलएनजी प्रकल्पातील टाक्यांमध्ये आणण्याचे काम सुरु झाले आहे
www.konkantoday.com