उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लोककलावंतांना मदतीचा हात पुढे केला

कोकणातील लोककलेला कोरोनाचा मोठा फटका बसला. ही लोककला जपणाऱ्या कलावंताना मदतीची गरज ओळखून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा हात पुढे केला. आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील नमन मंडळ,भजनी मंडळ आणि जाखडी मंडळांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले जसे नाट्यकलावंताना मानधन मिळतं तसेच मानधन नमन, जाखडी कलावंताना देण्यात यावे, याबाबत मी स्वत:सांस्कृतिक मंत्र्यासोबत चर्चा करणार आहे असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.यावेळी जिल्हापरिषद बांधकाम सभापती महेश म्हाप, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव,रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, चंद्रकांत गोताड, रत्नागिरी पं.स.सभापती प्राजक्ता पाटील, माजी जि.प.अध्यक्षा स्नेहा सावंत उपस्थित होत्या
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button