बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्यांना मनसे स्टाईलनं चांगलाच दणका
परप्रांतीयांविरोधात सातत्यानं आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सोमवारी मदतीसाठी कोळी महिलांनी धाव घेतली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जात या महिलांनी आपल्यापुढं असणाऱ्या अडचणी मांडत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा केली.
डोंगरी येथील कोळी समुदायातील या महिलांची गर्दी आणि त्यांची साद ऐकत खुद्द राज ठाकरे बाहेर येत त्यांनी या महिला वर्गाची भेट घेतली. त्यांचे प्रश्नही ऐकून घेतले. ज्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्येच मनसे स्टाईलनं या महिलांच्या अडचणी दूर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळं आमचा व्यवसाय मंदावल्याचं सांगत आपल्याला त्यांचा त्रास होत आहे. कृपया यात लक्ष द्या, अशी विनंती या महिलांनी केली होती. ज्यानंतर याच गोष्टीची दखल घेत स्थानिक मनसे विभाग अध्यक्ष संजय नाईक यांनी बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्यांना चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळालं.
www.konkantoday.com