जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाहेर लाईटच्या डीपी पोलवर चढलेला वीज कर्मचारी विजेचा शॉक लागुन गंभीर जखमी

रत्नागिरी जयस्तंभ परिसरात जिल्हाधिकारी कमानीचा बाहेर डीपीवर विद्युत प्रवाह खंडित झाल्याने दुरुस्तीसाठी चढलेला महावितरण चा कर्मचारी विद्युत प्रवाह चालू झाल्याने चिकटला व पोल वर चीकटुन राहिला.हा प्रकार लक्षात आल्यावर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.नगर परिषद अग्निशामक दलाला कळवण्यात आले त्यामुळे घटनास्थळ नगरपरिषदेचा अग्निशामक दल तसेच रुग्णवाहिका दाखल झाली.हा कर्मचारी पोलावरच अडकून राहिल्याने विद्युत प्रवाह बंद करून या कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशामक दल व अन्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन जेसीबी व शीडीच्या साह्याने खाली उतरवण्यात आले.ह्या कर्मचाऱ्याला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा प्रकार रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला.या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हा कर्मचारी काम करण्यासाठी पोलवर चढला असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button