
कोल्हापूर येथून आलेल्या औषधांच्या बॉक्सची प्रशासनाकडून चौकशी
कोल्हापूर येथून रत्नागिरी शहरात औषधाचा साठा घेऊन आलेल्या दोन गाड्यांची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरु झाली आहे. या दोन्ही गाड्या खासगी ट्रान्स्पोर्टच्या आहेत.
कोरोनामुळे परिस्थिती संवेदनशील असल्यामुळे सध्या प्रशासन सतर्क झाले आहे. त्या गाडीत सलाईनचे अठ्ठावीस बॉक्स आढळून आले आहेत. आठवडा बाजार नजीक हे टेम्पो थांबवण्यात आले हे टेम्पो नेमके कुठे चालले होते व ही सलाईन बॉक्सेस कोणासाठी मागवण्यात आले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, प्रांताधिकारी, तहसिलदार आदी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
www.konkantoday.com