
आंबा घाटातील तो प्रकार कर्जबाजारीपणामुळे बनाव; असल्याचे उघड
रत्नागिरी कोल्हापूर या महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणाजवळ सापडलेली बेवारस दुचाकी व त्या पासून काही अंतरावर सापडलेला मोबाईल व बेपत्ता व्यवसायिक यांचे गूढ साखरपा पोलिसांनी उलगडले. हा प्रकार कर्जबाजारी झाल्यामुळे रचलेला बनाव असल्याचे आता उघड झाले आहे असित सुतरीया राहणार कोल्हपूर हे दि. २४ सप्टेंबर रोजी दुचाकीने सनमाईका मार्केटींगसाठी रत्नागिरीत गेले होते. मात्र लॉकडाऊन काळात व्यवसायात आर्थिक अडचण आल्याने व व्यवसायात मंदी आल्याने आर्थिक संकट वाढले याच नैराश्येतुन कोल्हापूरला परत जात असताना दुचाकी व मोबाईल टाकून त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मात्र त्यातून आपण जगलो तर आपल्याला मोठी दुखापत होऊन कायमची अपंगत्व येईल त्यामुळे आपल्याला असेच जीवन जगावे लागेल या भीतीपोटी शेवटच्या क्षणी असित सुतरीया यानी निर्णय बदलला व ते आपल्या मूळगावी गुजरातला गेले. बेवारस सापडलेली दुचाकी मोबाईल व बेपत्ता व्यावसायिक याचा शोध कोल्हापूर व साखरपा पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली होती मात्र त्यांचा शोध लागत नव्हता अखेर पोलिसांनी आपली तपासाची मोहीम वेगळ्या दिशेने वळवली असता असित सुतरीया गुजरात मध्ये आपल्या मुलाकडे सुखरूप असल्याचे आढळून आले
www.konkantoday.com