
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांची तब्येत खालावली
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या रामविलास पासवान यांची अचानक तब्येत खालावल्याने शनिवारी दिल्लीत त्यांची हार्ट सर्जरी केली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान यांच्यावर रुग्नालयात उपचार सुरु होते.
www.konkantoday.com